महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रवादीशी संघर्ष नाही; संयमाने सरकार चालवले जातेय- अस्लम शेख

महाविकास आघाडी सरकारला २८ डिसेंबरला वर्ष पूर्ण होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष सत्तेत आल्यानंतर राज्यात कशा प्रकारे विकासाचे राजकारण केले, कोरोना काळातून सावरत राज्याला प्रगतीवर घेऊन जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कशा पद्धतीने सक्षम आहे, या सारख्या अनेक विषयावर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते आणि मत्स, वस्त्र उद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी संवाद साधला आहे.

वस्त्र उद्योग मंत्री अस्लम शेख
वस्त्र उद्योग मंत्री अस्लम शेख

By

Published : Nov 27, 2020, 4:44 PM IST

मुंबई- काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघाडी सरकार मधल्या प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका आहे. या भूमिकेतून काही वेळेला पेच निर्माण होतो, पण संयमाने या सरकारने आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असल्याचे वस्त्रोद्योग आणि मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शेख यांच्याशी ई टीव्ही भारतने संवाद साधला. यावेळी त्यांनी आघाडीतल्या राजकीय वातावरणावर चर्चा केली.

वस्त्र उद्योग मंत्री अस्लम शेख
विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळेच भावनिक मुद्यांवर दिशाभूल ...सरकारच्या कार्याचा सर्वाधिक भाग सध्या कोरोनाशी संबंधित आहे. गेले आठ महीने हे सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे काम करत आहे. केंद्राच्या आर9जि खात्याने आणि आय सीएम आर आय ने ही महाराष्ट्राच्या कार्याच्या गौरव केला आहे. पण विरोधक धार्मिक मुद्यांवर जनतेची दिशाभूल करत आहेत. कधी तीन तलाक तर कधी लव्ह जिहाद सारख्या मुद्यांवर भावना भडकवण्याचे काम होत आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थ व्यवस्था ढासळली असताना, भाजप नेते महाराष्ट्रावर टीका करत आहेत, असे शेख यांनी सांगितले.विरोधकांना उत्तर देऊ, मित्रांबाबत संयम बाळगून काम करावे लागते-काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर आधारित सरकार स्थापन केले आहे. यात निधी वाटपाचाही महत्वाचा भाग आहे. विकासाच्या कामांसाठी निधीची नितांत गरज असते. काही वेळेला आमच्या आमदारांना आणि विभागाला निधी मिळायला हवा, असे आम्हालाही वाटत असल्याचे मत शेख यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादी, काँग्रेसवर कुरघोडी करत आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना शेख यांनी थेट उत्तर देणे टाळले, पण राष्ट्रवादी सोबत संघर्ष नाही, असे सुचक वक्तव्य शेख यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details