मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर मुंबई मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फरारी घोषीत केले होते. परमबीर सिंग गुरुवारी मुंबईत आल्यानंतर त्यांनी फरार घोषित अर्ज रद्द करण्यात यावा याकरिता शुक्रवारी अर्ज केला होता त्या अर्जावर आज न्यायालय निर्णय सुनावणी झाली. यावेळी किला कोटाने मरीन ड्राईव्ह खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द ( Param Bir Singh's cancelled non-bailable warrant ) केले आहे.
परमबीर सिंगविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा वसुली प्रकरणात ( 100 crore recovery case ) आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर गोरेगाव पोलीस स्थानकात खंडणी प्रकरणाच्या तपासाकरिता कांदिवली युनिट 11 समोर त्यांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. मुंबईतील मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात गुन्हा संदर्भात न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. परमबीर सिंग यांच्या वकिलाकडून शुक्रवार (दि 27) न्यायालयात फरार घोषित केलेला आदेश रद्द करण्यात यावा, याकरिता अर्ज करण्यात आला होता या अर्जावर आज मंगळवार (दि. 30) रोजी सुनावणी झाली आहे. आज परमबीर सिंग यांना न्यायालयाकडून दिलासा मिळला असून त्यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. यावेळी परमबीर सिंग यांनी न्यायालयात आपण चौकशीला पूर्ण सहकार्य करू असे सांगितले.