महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील 'आक्सा' समुद्रकिनारा बंद - Axa beach news

मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड येथे असलेला आक्सा समुद्रकिनारा सध्या सुनसान दिसत आहे. नेहमी पर्यटकांनी गजबजलेला, परंतु तितकाच धोकादायक म्हणून ख्याती असलेला हा आक्सा समुद्रकिनारा सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.

Mumbai's Axa beach closed for safety reasons
सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील 'आक्सा' समुद्रकिनारा बंद

By

Published : Jun 10, 2020, 7:07 PM IST

मुंबई- पश्चिम उपनगरातील मालाड येथे असलेला आक्सा समुद्रकिनारा सध्या सुनसान दिसत आहे. नेहमी पर्यटकांनी गजबजलेला, परंतु तितकाच धोकादायक म्हणून ख्याती असलेला हा आक्सा समुद्रकिनारा सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील 'आक्सा' समुद्रकिनारा बंद

हेही वाचा...कोरोनाचा धसका; शाही इमामांच्या सचिवाच्या मृत्यूने हादरली दिल्ली, जामा मशीद होऊ शकते बंद

आक्सा समुद्रकिनारी मुंबईतील नागरिक मोठया संख्येने फिरायला येत असतात. तसेच पर्यटकांचा देखील इथे मोठा राबता असता. मिशन बिगीन अंतर्गत सुधारणा करून समुद्रकिनारी फिरायला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पंरतु, आक्सा किनारा याला अपवाद आहे.

या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक पोलिसांकडून बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत. आक्सा समुद्रकिनारी होणाऱ्या पाण्यात बुडण्याच्या घटना पाहता जीवरक्षक मात्र आजही येथे तत्पर आहेत. याबाबत येथील स्थानिक पोलिसांना विचारले असता सकाळी आणि संध्याकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनाच फक्त सध्या प्रवेश दिला जातो आहे. इतरवेळी मात्र किनारा बंद ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details