मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंड केले आहे. हे बंड सामान्य नागरिकांना आवडलेले नाही. सर्वसामान्य मुंबईकरांनी (mumbaikar's)यावर प्रतिक्रीया ( reaction) दिल्या आहेत.बंडखोरी करणारे लोक जनतेकडे दुर्लक्ष करतात, असे लोक स्वतःची पोट भरतात. असे होता कामा नये. ही विश्र्वासघातकी माणसे आहेत. हे असेच सुरू राहणार, सामान्य नागरिक भरकटत राहणार अशी प्रतिक्रिया सामान्य मुंबईकरांनी दिली आहे.
आत्तापर्यंत सर्व काही योग्य चालले होते. सरकार चांगले काम करत आहे. मुंबईत महाविकास आघाडीने अनेक कामे केली आहेत. क्लीन मुंबई ग्रीन मुंबई, बेस्टच्या नवीन बसेस सुरू केल्या आहेत. जे लोक इतर पक्षात जात आहेत त्यांना कोणी मोठी पदे देण्याचे आमिष दाखवले असेल. म्हणून ते इकडे तिकडे जात असतील. असे होता कामा नये. सध्यस्थितीत लोकांना समोर ठेवून कामे करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी फार चुकीचे केले. राजकीय वर्तूळात बरीच चर्चा सुरू आहे अशा प्रतिक्रिया सामान्य मुंबईकरांनी दिल्या आहे.