मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगर उष्णता वाढली आहे. त्यामुळे उन्हाळाच्या चटकेपासून बचावासाठी आता तोट्यातील एसी लोकलकड़े मुंबईकरांनी मोर्चा वळविला असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका लाखापेक्षा जास्त प्रवाशांनी एसी लोकलमधून ( Passenger journey in AC local ) प्रवास केलाची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे.
एसी लोकलमधून ५९ हजार प्रवाशांनी प्रवास
मुंबईत दमट हवामान ( Mumbai humid climate ) असते. त्यातच उन्हाळ्या आला की लोकलचा प्रवास अनेकांना नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे ( number of AC local passengers ) धावत घेतात. या कालावधीत एसी लोकलच्या प्रवाशांची संख्यासुद्धा वाढते. यंदा मध्य रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांची ( AC locomotives of Central Railway ) संख्या वाढविण्यात आलेल्या आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२२ महिन्यात मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून ५९ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.
प्रवाशी संख्या दीड लाखावर जाण्याची शक्यता
फेब्रुवारी महिन्यात एसी लोकलची प्रवासी संख्या १ लाख ३ हजार ४२२ वर जाऊन पोहोचली आहे. तर महसुलातसुद्धा मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. जानेवारी महिन्यात एसी लोकलमार्फत २४ लाख ४ हजार १३५ रुपये तर फेब्रुवारी महिन्यात ४२ लाख ८३ हजार ७८० रुपयांच्या महसूल मिळालेला आहे. मार्च महिन्याचा शेवटपर्यंत एसी लोकलची प्रवाशी संख्या दीड लाखावर जाण्याची शक्यता मध्य रेल्वेचा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एसी लोकलमध्ये गर्दी वाढली
रेल्वेचा थंडगार प्रवास मिळण्यासाठी एसी लोकल सुरू केली. मात्र, कमी फेऱ्या आणि जास्त भाडे यामुळे प्रवाशांनी एसी लोकलला पाठ दाखविली. पीक अव्हरमध्ये कोणी एसी लोकलमध्ये चढत नव्हते. त्यामुळे रिकाम्या एसी लोकल धावत होत्या. मात्र, गेल्या महिन्यापासून एसी लोकलला चांगली पसंती मिळत आहे. तर, दर सोमवारी प्रवाशांची एसी लोकलमध्ये गर्दी वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेनंतर एसी लोकलच्या फेर्यांमध्ये वाढ झाली आहे. नव्या वेळापत्रकात ३६ फेर्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यात ३४ एसी फेर्यांचा समावेश झाला आहे. सध्या एसी लोकलच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा या सेक्शनमध्ये ४४ फेर्या, हार्बरच्या सीएसएमटी ते पनवेल ८ फेर्या, पश्चिम हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव ८ फेर्या अशा ६० फेर्या चालविण्यात येत आहेत.
हेही वाचा-Suitcase Murder Case : 'सुटकेस मर्डर'चा झाला खुलासा.. प्रेयसीच्या हत्येसाठी प्रियकराने बनविला होता 'फुलप्रूफ प्लॅन'..
उन्हाळयात एसी लोकल भाडे कमी करा
गेल्या महिन्यापासून मध्य रेल्वेवर ३४ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आलेला आहे. या एसी लोकलचे तिकिट काढणे प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे एसी लोकलचे तिकिट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या उन्हाळयात एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवशांची संख्या वाढते. त्यामुळे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी निधान उन्हाळयात एसी लोकल ट्रेनच्या तिकिटांचे दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी एसी लोकलचे भाडे कमी करण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही निर्णय झालेला नाही.
हेही वाचा-Sanjay Raut Replied Fadnavis : 'तुम्ही म्हणजे देश नाही'.. संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले
मध्य रेल्वे एसी लोकल तिकीट दर-
सीएसएमटी ते कल्याण - १९५ रुपये
सीएसएमटी ते टिटवाळा - २०५ रुपये
सीएसएमटी ते अंबरनाथ - २०५ रुपये
मध्य रेल्वे साधी लोकल तिकीट दर -
सीएसएमटी ते कल्याण - १५ रुपये
सीएसएमटी ते टिटवाळा - २०रुपये
सीएसएमटी ते अंबरनाथ - २०रुपये