महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Winter Session 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत किती दिवस उपस्थित राहतात - नाना पटोले - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हिवाळी अधिवेशनाच्या ( Mumbai Winter Session 2021 ) पहिल्याच दिवशी विधासभेत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी नियमात बदल करण्याच्या प्रस्तावावर हंगामा बघायला भेटला. विधानसभा अध्यक्ष निवडणूक याच अधिवेशनात होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. पण, अध्यक्ष कोण असणार हे अजून गुपितच आहे. या सर्व प्रश्नांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांच्याशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीने

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Dec 22, 2021, 8:58 PM IST

मुंबई- हिवाळी अधिवेशनाच्या ( Mumbai Winter Session 2021 )पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री विधान भवनात उपस्थित न राहिल्याने विरोधकांनी या प्रश्‍नी आवाज उठवला. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) संसदेत किती दिवस उपस्थित राहतात. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन म्हणजे एक प्रकारचे जुमले होते हे विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक योग्य पद्धतीनेच

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी परंपरेनुसार चालत आलेल्या गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. याबाबत बोलताना पटोले म्हणाले, अशा पद्धतीने निवडणुका यापूर्वीही इतर राज्यात झालेल्या आहेत. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार, हे लवकरच समजेल. मला मंत्री पदाची अपेक्षा नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

जानेवारी महिन्यात राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर...

काँग्रेसच्या स्थापना दिनी म्हणजेच 28 डिसेंबरला राहुल गांधी यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पण, जानेवारी महिन्यात राहुल गांधी महाराष्ट्रात येत असून त्यांचा दौरा निश्चित झाल्याचेही नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा -Assembly Winter Session : प्रथा बदलण्याचा अट्टाहास का.. 170 च्या बहुमतावर सरकारला विश्वास नाही का? फडणवीस यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details