महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर ; वांद्रे वरळी सी लिंक बंद होणार? - वांद्रे वरळी सी लिंक

वांद्रे वरळी सी लिंक दळणवळणासाठी बंद करण्याचा सूचना देण्यात आले आहेत. मात्र सर्व अधिकार हे वाहतूक नियंत्रण विभागाकडे देण्यात आलेले आहे. येणाऱ्या काळामधली स्थिती पाहून अधिकाराचा वापर करत वाहतूक नियंत्रक वांद्रे वरळी सी लिंक प्रवासासाठी बंद करू शकतो. मात्र सध्या वाहतूक सुरू आहे.

वांद्रे वरळी सी लिंक बंद होणार?
वांद्रे वरळी सी लिंक बंद होणार?

By

Published : May 16, 2021, 9:14 AM IST

Updated : May 16, 2021, 10:43 AM IST

मुंबई - तौत्के चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर होत त्याचा प्रवास गुजरातच्या दिशेने सुरू आहे. पुढच्या काही तासांमध्ये हे चक्रीवादळ मुंबईच्या जवळून जाईल. सध्या हे वादळ मुंबई पासून ४९० किमी अतंरावर आहे. त्याचा परिणाम मुंबईमध्ये दिसू लागला आहे. शनिवारी रात्रीपासूनच हलक्‍या स्वरूपाचा पाऊस मुंबईत बरसू लागला आहे. वादळ जसजसे मुंबईच्या जवळ येईल तसे वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वांद्रे वरळी सी लिंक दळणवळणासाठी बंद करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सर्व अधिकार हे वाहतूक नियंत्रण विभागाकडे देण्यात आलेले आहे. या संदर्भातील आढावा घेतला आहे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी..

चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर

तौक्ते चक्रीवादळ सध्या गोवा राज्याच्या किनारपट्टी पासून दक्षिणेला १५० किलोमीटर अरबी समुद्रात आहे. त्याचा परिणाम राज्यातील काही जिल्ह्यात दिसून येत आहे. राज्यात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मुंबईतही शनिवारी रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जसजसे वादळ मुंबईच्या जवळ येईल तसा वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर वांद्रा वरळी सागरी सेतूवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्ष घेऊ शकतो. सध्य स्थितीत हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र, येणाऱ्या काळामधली वादळाची परिस्थिती पाहून वाहतूक नियंत्रक वांद्रे वरळी सी लिंक प्रवासासाठी बंद करू शकतात.

Last Updated : May 16, 2021, 10:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details