मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव द्यावे. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी मागणी केली होती. परंतु, राज्यपालांनी विद्यापीठाच्या सार्वजनिक कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी सूचना केली होती. दरम्यान मुंबई विद्यापीठातील अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यासारख्या सदस्यांनी सावरकरांचे नाव द्यावे, असे निवेदन देखील मुंबई विद्यापीठाला दिला होते. विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावे ते संयुक्तिक होईल. कारण छत्रपती शाहू महाराज यांनी भरीव शैक्षणिक कार्य केले आहे. या आधारे विद्यापीठाकडे मागणी केली होती. त्यासाठी आंदोलन केलं होतं, हे आंदोलनाचा परिणाम म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थी संघटनांनाची भेट घेतली आहे.
आंदोलनानंतर कुलगुरूंना आली जाग - मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गृहाला विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याच्या संदर्भातली सूचना राज्यपाल महोदयांनी काही दिवसापूर्वीच केली होती. राज्यपालांच्या या शिफारशीनंतर मुंबई विद्यापीठाचे आधी सभा सदस्य सुधाकर तांबोळी आणि इतर आधी सभा सदस्यांनी देखील सावरकरांचे नाव द्यावे, असे निवेदन दिले होते. त्याचबरोबर छात्र भारती, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया सत्यशोधक विद्यार्थी संघटना यांनी मिळून आंदोलन करत मागणी केली आहे की, छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देणे संयुक्तिक होईल. छत्रपती शाहू महाराज यांचे महाराष्ट्रामध्ये भरीव शैक्षणिक कार्य आहे. शिक्षणाच्या संदर्भात आपल्या संस्थानात बजेटचा भरपूर निधी शाहू महाराजांनी खर्च केले असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. यासोबत महाराष्ट्रामध्ये सर्व जातीृ- धर्मातल्या मुला- मुलींसाठी विशेषता वंचित गटातल्या मुला- मुलींसाठी देखील छत्रपती शाहू महाराजांनी विद्यार्थी वस्तीगृह सुरू केले होते.
छत्रपती शाहू महाराज यांचेच नाव द्यावे-याबरोबर शिक्षणाचा अधिकार प्रत्यक्षात त्यांनी दिला. पुरोगामी चळवळ गतिमान केली. समतेचा विचार प्रत्यक्षात अमलात आणला. तसेच व्यवसायिक शिक्षणही शाहू महाराज यांनी दिले आहे. यासाठी विविध प्रशिक्षण केंद्र उभारले. एवढं भरीव कार्य असतांना छत्रपती शाहू महाराज यांचेच नाव देणं संयुक्तिक असल्याचा विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी संघटनांनी एकत्र आंदोलन केले होते. त्याचा परिणाम म्हणून कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी नुकतीच विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त शिष्टमंडळाला भेट दिली आणि त्यांच्या भावना जाणून घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या भावना राज्यपालांकडे पोहोचवाव्या, अशी मागणी विद्यार्थांनी त्यांच्याकडे केली आहे. या संदर्भात कुलगुरू विद्यार्थ्यांचे म्हणणं राज्यपालांकडे पोहोचवणार असल्याची माहिती विद्यार्थी संघटनाचे नेते रोहित ढाले, प्रवीण मांजलकर आणि अमीर काजी यांनी ई- टीव्ही भारतला दिली आहे.