महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले - Mumbai

विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद यांसाठी मतदान आणि मतमोजणी ३० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी होणार आहे. तसेच, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान आणि २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी घेतली जाणार आहे.

mumbai university student council elections schedule declared

By

Published : Aug 1, 2019, 10:16 AM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठातील विविध विभागांसह महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठीचे कार्यक्रम आज विद्यापीठाने जाहीर केला. यानुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद यासाठी मतदान आणि मतमोजणी ३० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी होणार आहे. तसेच, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान आणि २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी घेतली जाणार आहे. अशी माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी दिली.

याच दरम्यान, विविध पक्षांकडून या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठात विद्यापीठातील विभाग, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरांवरून विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यापीठाकडून विद्यापीठ विभाग तसेच विद्यापीठ विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालय विद्यार्थी परिषद या तीनही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

अशा होतील निवडणुका :

  • विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद निवडणूक

तात्पुरती मतदार यादी जाहीर करणे : २० ऑगस्ट, सकाळी ११.००
आक्षेप नोंदविण्यासाठी तारीख : २२ ऑगस्ट, दुपारी ११.००
अंतिम मतदार यादी जाहीर : २२ ऑगस्ट, दुपारी ३.००
नामनिर्देश अर्ज दाखल : २३ ऑगस्ट, दुपारी ४.००
अर्जाची छाननी, वैध अर्जांची यादी : २६ ऑगस्ट, दुपारी ४.००
अर्ज मागे घेण्याची तारीख, अंतिम यादी : २८ ऑगस्ट, दुपारी १.००
विभाग प्रतिनिधीसाठी मतदान, मतमोजणी : ३० ऑगस्ट, १० ते ५.००
विद्यापीठ विभाग परिषदेच्या स्थापनेची घोषणा : ३० ऑगस्ट, सायं.५.००

  • महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक‍

तात्पुरती मतदार यादी जाहीर करणे : २० ऑगस्ट, सकाळी ११.००
आक्षेप नोंदविण्यासाठी तारीख : २२ ऑगस्ट दुपारी ११.००
अंतिम मतदार यादी जाहीर : २२ ऑगस्ट, दुपारी ३.००
नामनिर्देश अर्ज दाखल : २३ ऑगस्ट, दुपारी ४.००
अर्जाची छाननी, वैध अर्जांची यादी : २६ ऑगस्ट, दुपारी ४.००
अर्ज मागे घेण्याची तारीख, अंतिम यादी : २८ ऑगस्ट, दुपारी १.००
विभाग प्रतिनिधीसाठी मतदान, मतमोजणी : ३० ऑगस्ट
महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेची घोषणा : ३१ ऑगस्ट, सायं.५.००

  • विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक

तात्पुरती मतदार यादी जाहीर करणे : ७ सप्टेंबर, सकाळी ११.००
आक्षेप नोंदविण्यासाठी तारीख : ९ सप्टेंबर, दुपारी ४.००
अंतिम मतदार यादी जाहीर : १३ सप्टेंबर, सकाळी ११.००
नामनिर्देश अर्ज दाखल : १६ सप्टेंबर, सायंकाळी ५.००
अर्जाची छाननी, वैध अर्जांची यादी : १७ सप्टेंबर, दुपारी ४.००
अर्ज मागे घेण्याची तारीख, अंतिम यादी : २० सप्टेंबर, दुपारी १.००
विद्यापीठ प्रतिनिधीसाठी मतदान : २४ सप्टेंबर, सकाळी ११.००
मतमोजणी : २७ सप्टेंबर, सकाळी १०.००
विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेची घोषणा : ३० सप्टेंबर, दुपारी ४.००

ABOUT THE AUTHOR

...view details