मुंबई -विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात आपल्याला आवश्यक असलेली माहिती आणि मार्गदर्शन घेता येणार आहे.
मुंबई विद्यापीठाने सुरू केली विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन; परीक्षांसोबत प्रवेशासाठीही मिळणार मार्गदर्शन - Mumbai university helpline for students
मुंबई विद्यापीठाने कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात आपल्याला आवश्यक असलेली माहिती आणि मार्गदर्शन घेता येणार आहे.
कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालये यांच्या परीक्षांबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली होती, त्या समितीच्या शिफारशीनुसार पदवी व पदव्युत्तर वर्षाच्या अंतिम सत्राच्या, वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. पदवीस्तरावरील द्वितीय व तृतीय वर्षाच्या व पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या प्रवेशाविषयीही निर्देश दिले होते. या संदर्भात अधिक तपशील विद्यापीठ प्रसिद्ध करेल, असे जाहीर केले होते. यानुसार विद्यापीठ परीक्षा व प्रवेशाबाबत एक कृती योजना तयार केली जात आहे. यामध्ये प्रत्येक विद्याशाखेनुसार त्याचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर केला जाणार असून त्यापूर्वी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आज ९१ ९६१९० ३४६३४ व ९१ ९३७३७ ००७९७ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या examhelpline@mu.ac.in इमेलवरही आपल्या अडचणी अथवा माहिती मागवून घेण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे ही हेल्पलाईन सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असेल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. मुंबई विद्यापीठात नियमित विद्यार्थ्यांसोबतच दूर व मुक्त अध्ययन संस्थेतून (आयडॉलच्या)पदवी, पदविका आदी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असून त्या विद्यार्थ्यांसाठी nfo@idol.mu.ac.in या ईमेलवर महिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ईमेलवरून विद्यार्थी परीक्षा व प्रवेशाबाबत आपल्या समस्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.