मुंबई -विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ८०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील पदवीच्या प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट सोमवारी जाहीर झाली. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये एफवायची पहिली मेरिट लिस्ट नव्वदीपार पोहोचली आहे. यामुळे मुंबईतील शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळणे कठीण होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या मात्र मागील काही वर्षांत सरकारचे अनुदान नाकारत अल्पसंख्यांक दर्जा मिळवलेल्या मिठीबाई, केसी, झेवियर्स या सारख्या काही महाविद्यालयांचा अपवाद सोडल्यास इतर महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची कट ऑफ ही नव्वदीपर्यंत पोहोचली आहे. यात सोमय्या, जयहिंद, स्वामी दयानंद आदी महाविद्यालयात मागील वर्षांच्या तुलनेत कट ऑफ घटल्याचे समोर आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशासाठीच्या आनॅलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी एकूण २ लाख ६३ हजार १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी ७ लाख ८३ हजार ८९६ अर्ज विद्यार्थ्यांकडून भरण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही १८ जून ते २० जून या २ दिवसांच्या कालावधीतच केली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.
पहिल्या मेरिटची कट ऑफ
एच.आर महाविद्यालय
वाणिज्य - ९६ टक्के
विज्ञान - ९१.४० टक्के
कला - ९०.४० टक्के
जय हिंद महाविद्यालय