महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

निकाल जाहीर करा.. अन्यथा मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट घडवून आणू, ई-मेलवरून धमकी!

जर निकाल तात्काळ लावला नाही. तर विद्यापीठात स्फोट घडवून आणला जाईल,' अशी धमकी आरोपीने दिली आहे.मुंबई विद्यापीठाकडून या घटनेची चौकशी केली असता, हा मेल पाठवणारा एक विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची चौकशी पोलीस करत असल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेली आहे.

अन्यथा मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट
अन्यथा मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट

By

Published : Aug 14, 2021, 1:28 PM IST

मुंबई-कोरोनामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षांचे नुकसान होत आहे. त्यामुळे निकाल तत्काळ जाहीर करण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट घडवून आणण्याची ई-मेलवरून धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मुंबई विद्यापीठात खळबळ उडाली आहे.

सायबर पोलिसांकडून चौकशी-

मुंबई विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी स्वतंत्र ईमेल आयडीहून ही धमकी आली असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे धमकीतही आरोपींनी बीएससी, बीकॉम, बीए, यांचे 6 सेमिस्टरचे निकाल रखडलेला आहे. हा निकाल तत्काळ लावण्याची मागणी मेलमध्ये केली आहे. जर निकाल तात्काळ लावला नाही. तर विद्यापीठात स्फोट घडवून आणला जाईल,' अशी धमकी आरोपीने दिली आहे.
मुंबई विद्यापीठाकडून या घटनेची चौकशी केली असता, हा मेल पाठवणारा एक विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची चौकशी पोलीस करत असल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेली आहे.

विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही-

मेल पाठवणारा विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई सायबर पोलीस करत आहेत. मात्र, रविवारी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या मेलमुळे विद्यापीठ प्रशासनासह पोलीसही सावध झाले आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठात कडेकोट तपासणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details