महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला सावरकरांचं नाव; वाद पेटणार?

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आलं ( Mumbai University Hostel Named Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar ) आहे. मात्र, विद्यापीठाचा निर्णय राजर्षी शाहू महाराजांचा अपमान करणारा आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनने

By

Published : Jul 28, 2022, 7:47 PM IST

Updated : Jul 28, 2022, 7:58 PM IST

Mumbai University
Mumbai University

मुंबई -मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आलं आहे. आज ( 28 जुलै ) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या चर्चेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाचे नाव विनायक दामोदर सावरकर असे असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील छात्रभारती आणि इतर विद्यार्थी संघटनांनी सावरकरांच्या ऐवजी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कार्य करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृहाला देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली ( Mumbai University Hostel Named Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar ) होती.

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृहाचे नाव विनायक दामोदर सावरकर विद्यार्थी वसतिगृह असावे, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केली होती. त्यांच्या मागणीनंतर राज्यातील पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव विद्यार्थी वसतिगृहाला द्यावे, अशी मागणी केली. त्याबाबतचे निवेदन राज्यपाल आणि कुलगुरू मुंबई विद्यापीठ यांना दिलं होते. मात्र, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅ़ड. निल हेळकर, प्राध्यापक सुधाकर तांबोळी, धनेश सावंत यांनी सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती.

विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी यांची प्रतिक्रिया

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे नामकरण विनायक दामोदर सावरकर, असे करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सेनेच्या एकही सदस्याने यासंदर्भात विरोध केले नाही, ही बाब दखल घेण्याजोगी आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी छत्रपती शाहू महाराज यांचे महाराष्ट्रातील शैक्षणिक कार्य पाहता, त्यांचं नाव देण्याची मागणी केली होती. मात्र, आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राध्यापक सुधाकर तांबोळी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

'हा राजर्षी शाहू महाराजांचा अपमान' -विद्यापीठातील वसतिगृहाला सावरकरांचे नाव दिल्यानंतर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले म्हणाले की, शाहू महाराजांनी राज्यात सर्व जाती जमातीसाठी शिक्षणाकरिता वसतिगृह उभारली, चालवली, अनुदान दिले. त्यामुळे त्यांचे नाव देणं उचित झालं असतं. मात्र, विद्यापीठाचा निर्णय राजर्षी शाहू महाराजांचा अपमान करणारा आहे. या निर्णयविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही ढाले यांनी दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नामकराणाचा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -OBC Political Reservation : शिंदे-फडणवीस सरकारचे पितळ उघडे पडले, आता जनताच...; वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका

Last Updated : Jul 28, 2022, 7:58 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details