महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे एक पाऊल पुढे; प्रथम वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात - मुंबई विद्यापीठ प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलकडून प्रथम वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात. 2020- 21 या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. आयडॉलचे हे प्रवेश विद्यार्थ्यांना सहजपणे ऑनलाईन पद्धतीने घेता यावेत, यासाठीची विद्यापीठाकडून सुविधा देण्यात आली आहे. आयडॉलचे हे ऑनलाइन प्रवेश 18 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत

distance and open studies
मुंबई विद्यापीठ प्रथम वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात

By

Published : Nov 9, 2020, 7:42 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) आपल्या अनेक परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. आता 2020- 21 या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. आयडॉलचे हे प्रवेश विद्यार्थ्यांना सहजपणे ऑनलाईन पद्धतीने घेता यावेत, यासाठीची विद्यापीठाकडून सुविधा देण्यात आली आहे. आयडॉलचे हे ऑनलाइन प्रवेश 18 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. विनोद माळाळे यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 12 ऑक्टोबराला देशातील विविध विद्यापीठांना त्यांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या मान्यता संदर्भातील यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये मुंबई विद्यापीठातील आयडॉल या संस्थेचाही उल्लेख होता. यादीमध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम वर्षाचे प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये प्रथम वर्षाच्या बीए, बीकॉम, बीएसस्सी आयटी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एम.ए, एम.ए शिक्षणशास्त्र एम.कॉम आदी अभ्यासक्रमांची प्रवेश सुरू झाले आहेत.

आयडॉलमध्ये पहिल्यांदाच सत्र पद्धतीचा अवलंब

आयडॉलमध्ये सर्व अभ्यासक्रम वार्षिक पद्धतीचे चालवले जात होते. परंतु यापुढे ते सर्वच अभ्यासक्रम हे सत्र पद्धतीने चालवले जाणार आहेत. यासाठी मागील काही महिन्यापूर्वी यूजीसीने तसे निर्देश दिले होते. आता आयडॉलमध्ये पहिल्यांदाच पदवीच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एम एस्सी गणित, आयटी व एमसीए'चे अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरू केले जाणार आहेत.

आयडॉलमधील विद्यार्थी घेणार इतर ठिकाणी प्रवेश

आत्तापर्यंत आपला वेगळा अभ्यासक्रम आणि त्याची ओळख असणाऱ्या आवडला मुंबई विद्यापीठाच्या इतर महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या नियमित अभ्यासक्रम सोबतच आपले हे अभ्यासक्रम चालवावे लागणार आहेत. दुसरीकडे आयडल आणि महाविद्यालयांमधील एकच अभ्यासक्रम असल्याने संबंधित विद्यार्थ्यांना आयडल मध्ये किंवा आयडल मधून महाविद्यालयात पुढील वर्षात प्रवेश घेण्याची मुभा मिळणार आहे.


For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details