मुंबई:कोरोना नंतर प्रथमच मुंबई विद्यापीठ (mumbai university) आणि इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड पाहायला मिळाली. ऑफलाइन कोर्सेस साठी विविध स्तरावर विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. आता प्रवेश घेतलेल्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा (Mumbai University exams) 10 ऑक्टोबर पासून सुरू होणार होत्या, मात्र आता ह्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. (Mumbai University exams postponed)
Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या - मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) दुसऱ्या वर्षाची परीक्षा (Mumbai University exams) 10 ऑक्टोबर पासून सुरू होणार होत्या, मात्र आता ह्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे.(Mumbai University exams postponed). यामुळे विद्यापीठाशी संलग्न सुमारे 600 कॉलेजेस प्रभावित होणार आहेत.
600 विद्यालये प्रभावित: मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे 600 महाविद्यालय आहेत. या सहाशे महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, उपयोजित विज्ञान, मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध कोर्सेस साठी लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. मुंबई महाविद्यालयाशी संबंधित सर्व दुरुस्त शिक्षण केंद्र, मुक्त अध्ययन संस्था तसेच रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग यातील महाविद्यालये व स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड अप्लाइड सायन्स कल्याण, सर जेजे वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशा मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय आणि शिक्षण संस्था त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे यांनी दिली आहे.