मुंबई -मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळतात. त्याखाली अडकून काही लोक जखमी होतात. तर, काहींचा मृत्यू होतो. मात्र, ऐन उन्हाळ्यात हॉटेलच्या शेडवर झाड कोसळून ( Mumbai Tree Fall ) एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला ( One Dead Mumbai Tree Fall ) आहे.
Mumbai Tree Falls : मुंबईत हॉटेलच्या शेडवर झाड कोसळून एकाचा मृत्यू - हॉटेलवर झाड कोसळून एकाचा मृत्यू
माटुंगा पश्चिम येथील मोगल लेनवर असलेल्या गंगा विहार येथील हॉटेलच्या शेडवर झाड ( Mumbai Tree Fall ) कोसळले. त्यात एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला ( One Dead Mumbai Tree Fall ) आहे.
![Mumbai Tree Falls : मुंबईत हॉटेलच्या शेडवर झाड कोसळून एकाचा मृत्यू dead](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14784811-810-14784811-1647795954523.jpg)
dead
माटुंगा पश्चिम येथील मोगल लेनवर असलेल्या गंगा विहार येथे ही घटना घडली. येथील हॉटेलच्या शेडवर शुक्रवारी रात्री झाड कोसळले. या घटनेत हॉटेलमधील उपस्थित अजित तुळसकर ( वय, 64 ) यांच्या अंगावर झाड पडले. या दुर्घटनेत तुळसकर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा -Kolhapur By Election : सतेज पाटलांचा भाजपाला टोला; म्हणाले, लोक 'त्या' प्लॅस्टिकच्या डब्यांमधूनच...