मुंबई :मुंबई वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) आजपासून रायडर्स आणि सहप्रवासीला हेल्मेटसक्ती(Action Against bikers And Fellow Passengers) सुरू करण्यात आली आहे. आजमुंबई वाहतूक पोलिसांनी शहरात दिवसभरात 6 हजार 271 बाईकस्वारांसह सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, आगामी दिवसांत ही कारवाई अधिक कठोरपणेराबविली जाणार आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाई वाहतूक पोलिसांनी केली घोषणा : 25 मे ला वाहतूक पोलिसांनी एका पत्रकाद्वारे 9 जूनपासून मुंबई शहरात बाईक चालविताना बाईकस्वारांसोबत सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीची घोषणा (Announcement of Helmet Compulsion By Leaflet) केली होती. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. बाईक चालविताना बाईकस्वारासह मागे बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट घातले नाही, तर त्यांच्यावर पाचशे रुपयांची दंडाची तसेच बाईकस्वाराचे 3 महिन्यांसाठी लायसेन्स रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
9 जूनपासून केली सुरुवात : गुरुवारी 9 जूनपासून या कारवाईस वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली होती. दिवसभरात पोलिसांनी बाईकवरून प्रवास करणार्या 2 हजार 334 चालक, 3 हजार 421 सहप्रवासी आणि दोघांनी हेल्मेट घातले नाही, अशा 516 जणांवर कारवाई केली होती. अशा प्रकारे गुरुवारी दिवसभरात 6 हजार 271 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर काही बाईकस्वारांचे तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्याची कारवाई सुरू झाली आहे. या सर्वांविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 डी अन्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगण्यात आले.
वाढत्या अपघातामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय : विनाहेल्मेट बाईक चालविताना मुंबईसह इतर शहरातील अपघातात मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सर्वच बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती केली होती. हेल्मेट न घालणार्या बाईकस्वाराविरुद्ध वाहतूक पोलीस कारवाई करीत होते. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी बाईकवरून प्रवास करणार्या सहप्रवाशांना हेल्मेट सक्ती केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले, तर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Traffic Police Ransom : मुंबईत पोलिसांकडून टोईंग चार्जेसच्या नावाखाली बेकायदेशीर वसूली, याचिका दाखल