मुंबई -दिवाळी या सणासाठी देशभरात नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे मुंबईत राहणारे वेगवेगळ्या राज्यातील नागरिक पहिल्यांदाच आरक्षण करतात. त्यामुळे टिकीट ब्लँकने विकण्याची शक्यता असते. यासाठी रेल्वेने नागरिकांना अनेक सूचना दिलेल्या आहेत. यंदाच्या दिवळासाठी नागरिकांनी दीड महिन्यापूर्वीच आरक्षण केलं mumbai to bihar railway reservation full आहे.
पनवेल ते पटना एक्स्प्रेस आरक्षण फुल -पनवेल ते पटना म्हणजे बिहारमध्ये जाण्यासाठी एक्सप्रेस आहे. तिच्यामध्ये स्लीपर कोचसाठी ऑगस्ट महिन्यात 250, 300, 400 असे वेटिंग आजच्या क्षणी दाखवत आहे. तर, सप्टेंबर 10 तारखेला सुद्धा अडीचशेपेक्षा अधिक वेटिंग त्या ठिकाणी दाखवले जात आहे. तर, याच रेल्वेत थर्ड एसी आपण बुक करायचं म्हटलं तर, आजच्या तारखेला 50 वेटिंग आहे. पण, सप्टेंबरच्या महिन्यातील 250 ते 300 वेटिंग दिसत आहे.
हमसफर एक्स्प्रेस बांद्रा ते पटना आरक्षण फुल -बांद्रावरून निघणारी बिहारला जाणारी हमसफर एक्सप्रेस जिल्हा सचखंड एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. त्या गाडीच्या संदर्भात देखील आकडेवारी पाहून आपण अवाक होतो. उद्याच्या तारखेला बांद्रावरनं बिहारमध्ये पटनाला जाण्यासाठी स्लीपर कोच करिता जवळजवळ 96 वेटिंग आहे. तर, सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात हे वेटिंग काहीस कमी होऊन पन्नास वर येतं. पण, सप्टेंबरच्या जसजशा पुढील तारखा आपण सप्टेंबरच्या अखेर पाहत जातो. तर वेटिंग लिस्ट 100 पेक्षा अधिक वाढलेली दिसते.