महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रविवारी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी; तापमानात घट

मुंबईत रविवारी पाऊस झाल्याने हवेतील गारठा वाढला आहे. हवामान खात्याकडून पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळावर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

रविवारी पडलेल्या पावसाने मुंबईच्या तापमानात घट
रविवारी पडलेल्या पावसाने मुंबईच्या तापमानात घट

By

Published : Jan 4, 2021, 11:49 AM IST

Updated : Jan 4, 2021, 1:31 PM IST

मुंबई- शहरात रविवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे मुंबईच्या तापमानात घट झाल्याची नोंद झाली आहे. पाऊस पडल्याने हवेतील गारवा मात्र वाढला आहे. अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून त्याच्याभोवती लोक हात शेकतानाचे दृश्य नजरेस पडले.

मायानगरीच्या तापमानात घट होण्याची शक्यता

अलीकडेच मुंबईचे तापमान १३-१४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले होते. यामुळे मुंबईकरांना हुडहुडी भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा मायानगरीच्या तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दोन दिवस पावसाचा अंदाज

तथापि आज (सोमवार) थंडी जास्त नसली तरीही हवामान खात्यानुसार, ६ ते ७ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळावर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

Last Updated : Jan 4, 2021, 1:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details