मुंबई - गेल्या काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली ( Mumbai water issue solved ) आहे. मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणापैकी तानसा धरण गुरुवारी (१४ जुलै २०२२) रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू ( Tansa dam overflow ) लागले आहे. या धरणाला एकूण ३८ दरवाजे आहेत. त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.
दुसरे धरण वाहू लागले -मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणाच्या परिसरात म्हणजेच पालघर आणि नाशिक परिसरात मुसळधार पाऊस पडत ( Heavy rain in Palghar and Nashik ) आहे. यामुळे धरणांमधील पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. बुधवारी (१३ जुलै २०२२) मोडक सागर धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ गुरुवारी तानसा धरणदेखील ओसंडून वाहू लागले आहे. म्हणजेच, यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी २ धरणे आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागली आहेत.
तानसा धरण -तानसा धरणाचा विचार करता, गतवर्षी २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता तर त्याआधीच्या वर्षी २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन हे धरण भरुन वाहू लागले होते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. यापैकी, तानसा तलावाची जलधारण क्षमता सुमारे १ लाख ४५ हजार ०८० दशलक्ष लीटर इतकी आहे.
मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज-गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला ( Mumbai rains update news ) होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र पुढील दोन दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात ( Mumbai rains prediction ) आली आहे. मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार ( Mumbai rain prediction news ) पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबईकराने पावसाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडावे.