मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जूहू येथील अधिश बंगल्यातील सीआरझेडच्या ( CRZ ) अटींच्या उल्लंघन प्रकरणी मुंबई महापालिकेनंतर ( Mumbai Municipal Corporation ) राणेंना आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने ( Mumbai Suburban Collectorate ) नोटीस बजावले आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने यापूर्वी नारायण राणे ( Narayan Rane notice ) यांच्या घराची पाहणी केली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेने याआधी राणेंना नोटीस पाठवली होती.
महापालिकेची नोटीस :राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील कुरघोडीचे राजकारण काही थांबताना दिसत नाही. केंद्रातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप मविआकडून होत असताना राज्यातील सरकार भाजपा नेत्यांवर सूडाने कारवाई करत आहे, असा आरोप भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जूहू येथील अधिश बंगल्यातील सीआरझेडच्या अटींच्या उल्लंघन प्रकरणी मुंबई महापालिकेनंतर राणेंना आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावले आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने यापूर्वी नारायण राणे यांच्या घराची पाहणी केली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेने याआधी राणेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातून राणेंना नोटीस पाठवली गेली आहे. नारायण राणे यांना या प्रकरणी सुनावणीसाठी 10 जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.