मुंबई -बुल्ली बाई अॅप प्रकरणात बंगळुरु येथून पहिला आरोपी असलेला विशाल कुमार झाच्या जामीन अर्जावर गेल्या अनेक दिवसांपासून युक्तिवाद पूर्ण झाला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज (सोमवारी) न्यायालयाने निकाल दिला असून विशाल कुमार झाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशाल कुमार उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बुल्ली बाई या ॲपच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांची हेतू पुरस्कर बदनामी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यापूर्वी बांद्रा कोर्टाने विशाल कुमार झा याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज (सोमवारी) मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे विशाल कुमार झा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Bully Buy App Case : आरोपी विशाल कुमार झाचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला - मुंबई सत्र न्यायालय
पहिला आरोपी असलेला विशाल कुमार झाच्या जामीन अर्जावर गेल्या अनेक दिवसांपासून युक्तिवाद पूर्ण झाला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज (सोमवारी) न्यायालयाने निकाल दिला असून विशाल कुमार झाचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मायक्रॉसॉफ्ट आणि सॉफ्टवेअर शेअरिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या गिटहबवर बुल्लीबाई या अॅप अपलोड करण्यात आले आहेत. अॅपचा उद्देश मुस्लिम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करण्याचा आहे. अॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले असून मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणी विशाल कुमार झाला बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. विशालने जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश एस. जे. घरत यांनी हा निर्णय दिला आहे.
सुनावणीवेळी या प्रकरणातील विशाल मुख्य आरोपी नसून इतर राज्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींशी त्याचा काहीही संबंध नाही. विशालचा लॅपटॉप, फोन आणि सिम कार्ड पोलिसांनी जमा करून घेतले असून तो तपासत संपूर्ण सहकार्य करत आहे. तसेच तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवत असल्याचा दावा वकील शिवम देशमुख यांच्याकडून करण्यात आला. तर विशालची 6 ट्विटर, 6 इंस्टाग्राम, 1 यूट्यूब आणि 6 जी-मेल खाती आहेत. तसेच गिथब प्लॅटफॉर्मवरील त्याच्या खात्याबाबत त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून बाजू मांडताना सांगण्यात आले होते.
बुल्ली बाई एक असे ॲप्लिकेशन आहे. जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या आरोपींविरोधात आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, IT च्या कलम 67 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरु केला होता.
हेही वाचा -Thane Crime News : उल्हासनगरमध्ये अज्ञाताकडून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक