मुंबई -कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन खानला एनसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. ( Mumbai Sessions Court ) आर्यन खानने पासपोर्ट परत मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाने आज बुधवार (दि. 13 जुलै)रोजी मंजूर केला आहे. त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे.
पासपोर्ट परत करण्याचे निर्देश - आर्यन खानने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टाने एनसीबीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ( Aryan Khan Drugs Case ) हे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी निर्देश दिले होते. त्यावर एनसीवी करून कुठलीही हरकत घेण्यात आली नसल्याने आज सुनावणीदरम्यान आर्यन खानला पासपोर्ट परत करण्याचे निर्देश न्यायाधीश वैभव पाटील यांनी दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता - या प्रकरणातील आरोप पत्र 27 मे रोजी सादर केलेल्या त्यावेळी एनसीबीने आर्यनसह सहा आरोपींवरील आरोप वगळले. पुरेशा पुराव्याअभावी त्यांना सोडून दिले होते. आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि क्रूझ पाहुणे मुनमुन धमेचा यांना 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते. त्यांना महिन्याच्या अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आर्यनवर कुठलेही औषध सापडले नाही. मर्चंट आणि धामेचा यांचा आरोपपत्रात समावेश आहे. एफआयआरमध्ये 20 आरोपींची नावे आहेत. कथित अमली पदार्थ तस्कर अब्दुल कादर आणि नायजेरियन नागरिक चिनेदू इग्वे हे दोनच आरोपी तुरुंगात आहेत.
आर्यनला जामीन मिळण्याची ही तीन महत्वाची कारणे
- आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते त्याने त्याचवेळी स्पष्ट केले की ते आर्यनसाठी नव्हते. उलट आर्यन त्याला सांगत होता की ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, अशी माहिती त्या मित्राने आपल्या जबाबात दिली होती.
- आर्यन खानच्या व्हॉटसअॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध आलेला नाही.
- आर्यन खानने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही.
- नेमकं प्रकरण काय?