मुंबई- येस बँकेचे ( Yes Bank ) संस्थापक राणा कपूर ( Rana Kapoor ) त्यांची अवांता समूहामध्ये आर्थिक गैरव्यवहार ( Avanta Case ) झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बुधवारी (दि. 16 फेब्रुवारी) मुंबई सत्र न्यायालयाने राणा कपूर यांचा जामीन अर्ज काही अटी व शर्तीवर मंजूर करण्यात आला आहे.
सीबीआयने ( CBI ) अमृता शेरगीलच्या ( Amruta Shergil ) मालमत्ते खरेदीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी प्रथम सीबीआयने याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीनेही केला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आढळून आल्यानंतर राणा कपूर यांना अटकही करण्यात आली होती. राणा कपूर यांचा जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त मंजूर केला आहे. भारताबाहेर न जाणे, ही यातील प्रमुख अट असून न्यायालयाने राणा कपूर यांना पासपोर्ट न्यायालयासमोर जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत.
काय आहे प्रकरण..? -मार्च 2020 मध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने कपूर, त्यांची पत्नी बिंदू, अवंता ग्रुपचे प्रवर्तक थापर आणि ब्लिस अबोड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि बेकायदेशीर कृत्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.