मुंबई - भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांचे पुत्र भाजप नगरसेवक नील सोमैया यांची अटकपूर्व जामीन ( Neil Somaiya Anticipatory Bail Application ) अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने 1 मार्च रोजी फेटाळून लावला होता. या निर्णयावरील सविस्तर निकाल प्राप्त ( Mumbai Court detailed orders ) झाला असून सत्र न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यामुळे रिकामी (blank) अटकपूर्व जामीन देता येत नाही असे न्या. दीपक भागवत यांनी म्हटले आहे.
'म्हणून' फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज -
नील सोमैया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करताना मुंबई सत्र न्यायालयाने आपल्या विस्तृत आदेशात असे म्हटले आहे कि, राकेश वाधवान सोबत जमीन डील प्रकरणात जे आरोप आहेत ते वसईतले आहेत आणि वसई हे मुंबई सत्र न्यायालयाच्या कार्य कक्षेत येत नाही. त्याचबरोबर पीएमसी बँक प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखे व्यतिरिक्त ईडी ही करत आहे आणि ईडीचे सदर न्यायालय हाताळत नाही असे ही अतिरिक्त सत्र न्यायधीश दीपक भागवत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर न्यायालयाने आपल्या आदेशात असे ही म्हटले आहे कि, या प्रकरणात अजून कुठे गुन्हा दाखल नाही किंवा गुन्ह्याचा स्वरूप काय आहे. कुठल्या व्यावसायिक डीलच्या संदर्भात आरोप आहेत हे ही स्पष्ट नाही. त्यामुळे न्यायालय सरसकट संरक्षण देऊ शकत नाही. म्हणून कोर्टाने वरील निरीक्षण नोंदवत नील सोमैया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
बाप बेटे दोनो जेल जायेंगे - संजय राऊत
विशेष म्हणजे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदमध्ये नील सोमैया यांच्यावर पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाढवणे सोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले होते कि, 'बाप बेटे दोनो जेल जायेंगे'. संजय राऊत यांच्या सदर आरोप नंतर नील सोमैया यांना आपल्या अटकेची भीती होती. म्हणून त्यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता आणि मागणी केली होती कि अटक करण्याच्या स्थितीमध्ये त्यांना ७२ तासापूर्वी सूचना देण्यात यावी. मात्र वरील निरीक्षण नोंदवत अतिरिक सत्र न्यायधीश दीपक भागवत यांनी नील सोमैया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.