मुंबई -शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊतांना 5 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली sanjay raut judicial custody till 5 september आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम. जी. देशपांडे यांनी ही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी सत्र न्यायालयात संजय राऊतांच्या पत्नी, मुलगी आणि बंधू उपस्थित होते.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण? - ईडीने पत्राचाळ प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना अटक केली होती. ते गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार सन २०१० मध्ये करण्यात आला होता.