मुंबई -मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल. लोकल रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. त्यात सकाळी आणि संध्याकाळच्या सुमाराला तर खूप गर्दी असते. 16 वर्षांपूर्वी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही लाईफलाईन अशीच धावत होती. त्यावेळी अचानक एका पाठोपाठ एक असे सात बॉम्बस्फोट झाले आणि मुंबईची लाईफलाईन हादरुन ( Bomb Blast Local Trains 16 Year Complete ) गेली. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या 7 स्थानकांवर झालेल्या या बॉम्बस्फोटाने मुंबईसह देशभरात एकच खळबळ उडाली. या बॉम्बस्फोटात दोनशेहून अधिक निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला तर सातशेहून अधिक लोक जखमी ( Mumbai Serial Bomb Blast ) झाले.
209 जणांचा मृत्यू -11 जुलै 2006 रोजी पश्चिम रेल्वेवर पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खाररोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा, बोरीवली आणि वांद्रे या सात स्थानकामध्ये हे स्फोट झाले. यावेळी 209 जणांना जीव गमवावा लागला होता. तर, 714 जण जखमी झाले. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा मुंबई हादरली होती.
714 जण जखमी -2006 मध्ये पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एका पाठोपाठ एक असे एकूण 7 बॉम्बस्फोट झाले आणि मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खार रोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरीवली, वांद्रे या ठिकाणी 11 मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले. त्यात 209 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आणि 714 जण जखमी झाले. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. याच बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये आजही या कटू आठवणीच्या जखमा ताज्या आहेत.
13 आरोपींमधून 12 जण दोषी - याप्रकरणी 2015 रोजी न्यायालयाने 13 आरोपींमधून 12 जणांना दोषी ठरवले होते. यातील कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान,असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर, तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.