महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईतील नव्या रुग्णंसख्येत घट; तर शून्य मृत्यूची नोंद

मुंबईत मागील काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली ( Mumbai Corona Update ) होती. मात्र, आज 34 नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Sees 34 Corona Cases ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली ( Zero Death In Mumbai ) आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

By

Published : Apr 18, 2022, 9:40 PM IST

मुंबई -मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third wave Of Corona Virus) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease Corona Cases In Mumbai ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन बुधवारी ७३, गुरुवारी ५६, रविवारी ५५ रुग्ण आढळून आले. त्यानंतर आज ( 18 एप्रिल ) पुन्हा रुग्णसंख्येत घट होऊन ३४ नवे रुग्ण आढळून ( Mumbai Sees 34 Corona Cases ) आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद ( Zero Death In Mumbai ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून, ३५७ सक्रिय रुग्ण ( Mumbai Active Corona Cases ) आहेत.

३४ नवे रुग्ण - मुंबईत सोमवारी ३४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार ७९९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ८८० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३५७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १४,७४२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३४ रुग्णांपैकी ३३ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार १४३ बेड्स असून त्यापैकी ११ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४ रुग्णांची नोंद झाली आहे.

६० वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ६० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात १५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ठाण्यातील मृत्यूदर 1.67 टक्के -ठाण्यात 15 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली ( Thane Corona Update ) आहे. तर, मागील चोवीस तासांत शून्य मृत्यू नोंदवण्यात ( Thane Corona Death ) आले. आतापर्यंत जिल्ह्यात 11 हजार 889 मृत्यू झाले असून, मृत्यूदर 1.67 टक्क्यांवर पोहचला आहे.

हेही वाचा -Narayan Rane Adhish Bunglow : नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर कधीही पडू शकतो हातोडा?

ABOUT THE AUTHOR

...view details