मुंबई -महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना व नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा (Mumbai Schools Closed) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी आहे.
मुंबईतील 1 ली ते 8 वी च्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद (Mumbai Schools Closed ) ठेवण्यात येणार आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- मुंबईतील पहिली ते 9 वी आणि 11 वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार
- मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 4 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान बंद राहणार.
- कोरोना आणि ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
- या दरम्यान शाळा ऑनलाईन सुरू राहतील
- लसीकरणाला 15 ते 18 वयोगटातील मुलांना बोलवता येईल
- 10 वी व 12 वीच्या शाळा सुरू राहणार
कोरोनामुळे देशातील अन्य राज्यातील निर्बंध कडक, शाळा-महाविद्यालये बंद -
कोरोना व ओमायक्रॉन संसर्गामुळे बंगालमधील शाळा बंद -
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून, त्यामुळे तेथील राज्य सरकारने तातडीने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. बंगालमध्ये आज ३ जानेवारीपासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढलेल्या दिल्ली, मुंबईहून पश्चिम बंगालला आठवड्यातून केवळ दोन दिवसच विमानसेवेस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली आहे. विमानसेवेबाबतचा आदेश उद्यापासून ( मंगळवार) अंमलात येईल.