महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai School Reopening : मुंबईमधील १ ली ते ७ वीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू - Omicron Variant in Mumbai

राज्यातील ओमायक्रॉन विषाणूच्या (Omicron Variant in Mumbai) धर्तीवर कोरोना नियमांचे पालन करत मुंबईमधील इयत्ता 1 ते 7 वीच्या शाळा (1st to 7th Standard) १५ डिसेंबरपासून (Mumbai School Reopening From 15th Dec) सुरु केल्या जातील अशी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

Mumbai School Reopening
मुंबई शाळा

By

Published : Dec 14, 2021, 3:36 PM IST

मुंबई -राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने राज्य सरकारने १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील शाळा १५ डिसेंबरपासून (Mumbai School Reopening From 15th Dec) सुरु केल्या जातील अशी घोषणा करण्यात आली होती. पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर १५ डिसेंबर पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

तयारी करण्यासाठी उशीर -
राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्याबाबत जीआर सरकारने काढला होता. मात्र जगातील काही देशांमध्ये ओमायक्रॉन (Omicron Variant) या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार झाला. त्यामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरु असल्याने पालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी शाळा सुरु करायच्या झाल्यास इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांना मास्कसाठी खरेदी, मास्कचे विद्यर्थ्यांना वाटप करणे, शाळांमध्ये सुरु असलेली कोविड लसीकरण केंद्र बंद करणे आदी तयारी करावी लागणार असल्याने शाळा सुरू करण्यात उशीर झाला आहे. पालिका आयुक्तांनी मुंबईमधील कोरोनाचा आढावा घेतल्यावर शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शाळा सूरु केल्या जात असल्याचे तडवी यांनी सांगितले.

पालकांचे संमती पत्र घ्यावे लागणार -
मुंबईमध्ये १ ते ७ वीच्या वर्गात सुमारे ३ लाख विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा सुरु करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. या वर्गातील विद्यार्थी लहान वयाचे असल्याने त्यांच्या पालकांनी परवानगी दिली तरच त्यांना शाळेत ऑनलाईन पद्धतींने शिकवले जाईल. ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे नसेल त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाईल. या कालावधीत सर्व शाळांच्या इमारती सॅनिटाईज करून स्वच्छ केल्या जातील असे तडवी यांनी सांगितले.

असे असतील नियम -
- शाळा सुरु केल्यावर एका बेंचवर एका विद्यार्थी असेल.
- शाळेत २ ते ३ तास विद्यार्थी येतील.
- दोन सत्राच्या मधल्या वेळात शाळा सॅनिटाईज केल्या जातील.
- विद्यार्थ्यांना शाळेत मास्क घालावे लागेल.
- सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार.
- जे विद्यार्थी शाळेत येतील त्यांना ऑफलाईन शिक्षण तर जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार.

हेही वाचा -Mumbai School Reopening : मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार

ABOUT THE AUTHOR

...view details