मुंबई -मुंबईतील सांताक्रूझमधील विद्यार्थ्यांना घरी सोडणारी शाळेची बस न पोहचल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली ( Mumbai School Bus Missing ) होती. स्कूल बसच्या चालकाचा मोबाईल फोन बंद येत असल्याचे पालकांच्या पालक धास्तावले होते. त्यांनी मुलांच्या सुरक्षेसाठी थेट शाळेत धाव घेतली. मात्र, आता ती बस मिळाली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण? - मुंबईतील सांताक्रूझ येथे पोतदार इंटरनॅशनल स्कूलची बस 15 विद्यार्थ्यांसोबत 12.30 वाजता शाळेतून निघाली होती. ही बस विद्यार्थी घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहचली नाही. पाच तास बसचा पत्ता लागत नव्हता. त्यानंतर ही बस कोठे आहे याचा तपास सुरु करण्यात आला होता.