महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक! मुंबईत दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्ण व मृत्यूची नोंद

मंगळवारी 441 नव्या रुग्णांची तर 8 मृत्यूची नोंद झाली आहे. 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 925 दिवसांवर पोहचला आहे.

Mumbai reports 441 new Covid-19 cases, 600 recoveries and eight deaths last 24 hours
मुंबई कोरोना अपडेट : दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्ण व मृत्यूची नोंद, 441 नवे रुग्ण, 8 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Jul 13, 2021, 11:32 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यादरम्यान रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. त्यात गेल्या महिनाभरात घट झाली आहे. जुलै महिन्यात त्यात आणखी घट झाली असून दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णांची तसेच मृत्यूची मंगळवारी नोंद झाली आहे. मंगळवारी 441 नव्या रुग्णांची तर 8 मृत्यूची नोंद झाली आहे. 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 925 दिवसांवर पोहचला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 925 दिवसांवर -
मुंबईत मंगळवारी 441 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 28 हजार 615 वर पोहोचला आहे. आज 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 644 वर पोहोचला आहे. आज 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 3 हजार 677 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 6 हजार 950 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 925 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 5 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 65 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 30 हजार 100 तर आतापर्यंत एकूण 75 लाख 92 हजार 501 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अशी होतेय रुग्णसंख्या कमी -
4 एप्रिलला 11,163, 7 एप्रिलला 10428, 1 मे रोजी 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 8 जून ला 673, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 21 जून ला 521, 22 जून ला 570, 4 जुलै ला 548, 5 जुलै ला 489, 6 जुलैला 453, 13 जुलैला 441 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details