मुंबई -अमेरिकेत हिप-हॉप चळवळीनं कृष्णवर्णीयांना नवं बळ दिलं. तसं आपल्याकडेही होत आहे. भारतात भारतातील रेप गाण्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जात आहे. गोवंडी येथे राहणारी पंधरा वर्षाची सानिया रॅप सॉंग्स माध्यमातून सामाजिक प्रबोधन (Spreading awareness through Rap) करत आहे. तिचे गाणे देशभरात आवडीने ऐकले जात आहे. तसेच तिचे कौतुक सर्व स्तरातून होताना दिसते.
Mumbai Rapper : वाचा रॅपमधून समाज प्रबोधन करणाऱ्या गली गर्लची कथा... - rapper girl
गोवंडी येथे राहणारी पंधरा वर्षाची सानिया (Sania Mistry) रॅप सॉंग्स माध्यमातून सामाजिक प्रबोधन (Spreading awareness through Rap) करत आहे. तसेच तिचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
रॅप हे समाजमाध्यम
जेव्हा रॅपला सुरवात केली तेव्हा ना शूट करायला भला मोठा कॅमेरा होता ना एडिटिंगसाठी साधन सामुग्री. छोट्या भावाच्या मदतीने मोबाईलवर या गोष्टी केल्या. इथून पुढेही झोपडपट्टी भागातील अनेक प्रश्नावर रॅपच्या माध्यमातून व्यवस्थेच लक्ष केंद्रित करायचं आहे. अनेक वर्षांपासून आपले प्रश्न मांडायचे असतील तर अनेक माध्यम होती. वृत्तपत्र, मासिके, व्यंगचित्र अशा अनेक माध्यमातून समाजातील प्रश्न मांडले जायचे परंतु आताची नवीन पिडी आजूबाजूचे प्रश्न मांडण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करतायत तसेच रॅप हे देखील साधन पुढे येत आहे असे सानिया हिने सांगितले.