मुंबई -मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला आहे. या पहिल्याच पावसात रेल्वे आणि महापालिकेने नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा फोल ठरला आहे. याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. आज मुंबईतून बाहेर गावी जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
- मेल- एक्स्प्रेस गाड्या रद्द -
शहर आणि उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला. रात्रीपासून मुंबईत मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना याचा फटका बसला. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेल-एक्सप्रेस सेवांवर मोठा परिणाम झाला. अनेक रेल्वे गाडयांना शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत तर मुंबईतून सुटणाऱ्या सीएसएमटी-आसनसोल विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी- हैदराबाद विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी -हावडा विशेष एक्स्प्रेस सारख्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्या आहेत. काही मेल- एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा -Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नव्हता.. मुसळधार पावसाने साचले पाणी - महापौर
- सीएसएमटीवरून सुटणाऱ्या गाड्या