महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Rain Update Today : मुंबईत आज ढगाळ वातावरण ; हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

मुंबईमध्ये ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला ( Mumbai Rain Update ) आहे. मुंबईत गेले दोन दिवस रात्रीचा पाऊस पडत असून आज मंगळवारी ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिल्याचे पालिकेकडून कळवण्यात आले ( Cloudy weather with light to moderate rain ) आहे.

Mumbai Rain Update Today
मुंबईत पावसाचा येलो अलर्ट

By

Published : Sep 13, 2022, 9:34 AM IST

मुंबई -मुंबईमध्ये ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला ( Mumbai Rain Update ) आहे. मुंबईत गेले दोन दिवस रात्रीचा पाऊस पडत असून आज मंगळवारी ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिल्याचे पालिकेकडून कळवण्यात आले ( Cloudy weather with light to moderate rain ) आहे.

पावसाचा येलो अलर्ट -मुंबईत जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. गणेशोत्सव सुरू होताच पुन्हा पावसाने हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यात ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान मुंबईत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला ( Yellow alert for rain in Mumbai ) आहे. यादरम्यान मुंबईत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हलका ते मध्यम पाऊस - आज मंगळवारी शहर आणि उपनगरात सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहणार ( light to moderate rain in Mumbai ) आहे. हलका ते मध्यम पाऊस पडेल. संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज दुपारी १.३८ वाजता समुद्राला ४.४७ मीटर तर मध्यरात्री (१४ सप्टेंबर) २.१६ वाजता ४.३७ मीटर उंचीची भारती आहे. यावेळेत मुसळधार पाऊस पडल्यास, साचलेले पाणी समुद्रात सोडणे शक्य नसल्याने पाणी साचण्याची शक्यता असते.



२४ तासात इतक्या पावसाची नोंद - मुंबईत १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात शहर विभागात ५१.१९, पूर्व विभागात ५१.१० तर पश्चिम उपनगरात ६९.८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस पश्चिम उपनगरात पडला ( rain in Mumbai today ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details