मुंबई- मुंबईमध्ये ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. गेले दोन ते तीन दिवस मुंबईत सायंकाळ नंतर पावसाला सुरुवात होते. काल मंगळवारी मध्यरात्री १२ नंतर मुंबईत जोरदार पाऊस पडला यामुळे मुंबईच्या सखल भागात काही काळ पाणी साचले ( Heavy rain in middle of night ) होते. पहाटे पाऊस थांबल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दरम्यान मुंबईमधील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली ( Mumbai rain update) आहे.
पावसाचा येलो अलर्ट -मुंबईत जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाला सुरुवात ( Heavy rain in Mumbai ) झाली. ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. गणेशोत्सव सुरू होताच पुन्हा पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान मुंबईत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला ( Heavy rain in middle of night in Mumbai ) आहे. यादरम्यान मुंबईत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.