मुंबई- रविवारी सकाळीदेखील पावसाचा जोर कायम राहिला आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
- दिंडोशी दुर्घटना: जखमींची नावे - मोहम्मद शेख (वय १५), झुबेदा शेख (वय ७०), अहेमद शेख (वय १४), अब्दुल शेख (वय ४५). सर्वांची प्रकृती स्थिर.
- दिंंडोशी गोरेगाव येथे दरड कोसळून चार जखमी, जखमींना जोगेश्वरी ट्रॉमा केअर रूग्णालयात केले दाखल.
- एनडीआरएफची आठ पथके ठिकठिकाणी तैनात.
पेण (रायगड), कादवली (ठाणे), शहद (कल्याण), कुर्ला, परेल, कामशेत (पुणे), हिंजवडी/मुळशी (पुणे) आणि चांदोरी (नाशिक) याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
- पावसामुळे रस्ते वाहतूकदेखील विस्कळीत.
वाहतूकीसाठी बदललेले मार्ग-
१. समाज मंदिर हॉल प्रतिक्षा नगर, हेमंत मांजरेकर रोड मार्गे
२. मोतीलाल नगर पोस्ट ऑफिस, बेस्ट नगर मार्गे
३. साईनाथ सब-वे, मदिना मंझिल मार्गे
४. सायन रोड नं २४, सायन रोड नं ३ मार्गे
५. दहिसर सब-वे अप आणि डाऊन, सुधीर फडके फ्लायओव्हर मार्गे
६. मिलन सब-वे, मिलन फ्लायओव्हर मार्गे
७. डहाणूकर वाडी, बोरसा पाडा मार्गे - मुंबई शहरात गेल्या 24 तासांमध्ये 146 मिलिमीटर पावसाची नोंद. तर, पूर्व उनगरात 195 मिलिमीटर आणि पश्चिम उनगरात 195 मिलिमीटर पावसाची नोंद.
- मध्य रेल्वेच्या सहा गाड्या रद्द, सहा गाड्यांचा मार्ग बदलला आणि एक गाडी शॉर्ट टर्मिनेटेड.
या सहा गाड्या झाल्या आहेत रद्द -
२२१०१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस
२२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
१२११८ मनमाड-एलटीटी एक्सप्रेस
१२११७ एलटीटी-मनमाड एक्सप्रेस
५१०३३ मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर
५१०४४ साईनगर शिर्डी-मुंबई फास्ट पॅसेंजर - मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे तसेच नागरिकांनाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन.
- समुद्रात भरतीमुळे ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याचा अंदाज.
- वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता.
- हार्बर मार्गावर सीएसएमटी-वडाळा, वाशी-पनवेल, सीएसएमटी-अंधेरी-गोरेगाव मार्गांवर रेल्वे सेवा सुरू.
- हार्बर मार्गावरील वडाळा-कुर्ला रेल्वे सेवा बंद.
- कुर्ला-सायन दरम्यान रेल्वे सेवा बंद.
- कल्याण रेल्वे स्थानकात पाणी साचण्यास सुरुवात.
- अंबरनाथ, बदलापूर, चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने अंबरनाथ पुढे रेल्वे सेवा बंद.
- मध्य रेल्वे सेवेवर परिणाम.
- अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.