महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्री औटघटकेचा ठरणार का..? - शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज अत्यंत नाट्यमय घडामोडी घडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी अजित पवार यांच्यासोबत शपथग्रहण केली. यानंतर राज्यातील सत्ताकारणाची सूत्रे बदलली असून विविध पातळीवरती घडामोडींना प्रचंड वेग आला.

मुख्यमंत्री औटघटकेचा ठरणार का..?

By

Published : Nov 23, 2019, 3:41 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज अत्यंत नाट्यमय घडामोडी घडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी अजित पवार यांच्यासोबत शपथग्रहण केली. यानंतर राज्यातील सत्ताकारणाची सूत्रे बदलली असून विविध पातळीवरती घडामोडींना प्रचंड वेग आला.

मुख्यमंत्री औटघटकेचा ठरणार का..?

महा विकास आघाडीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांसोबत उपस्थित आमदारांना देखील समोर आणल्याने मुख्यमंत्रीपदाचा दावा औटघटकेचा ठरेल की काय? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कमिटीचे सदस्य सातत्याने महा विकास आघाडीच्या रणनीती कडे लक्ष ठेवून आहेत. पत्रकार परिषदेतील प्रत्येक घडामोडींवर कोणती रणनीती ठरवण्याचत येणार, यासंदर्भात काथानाट्य सुरू आहे. भाजपकडून प्रदेश कार्यालयांमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांसह आमदारांची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तत्पूर्वी भाजपवर कमिटीचे सदस्य वर्षा निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. एकंदरीतच महाराष्ट्राचे राजकारण एका नव्या वळणावर असून आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा कस लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details