महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीसच करणार' - मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत

मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम आहेत, तसेच मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

By

Published : Jul 29, 2020, 11:18 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केली होती, पण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार नाही. मुंबई पोलीसच याप्रकरणी तपास करतील, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम आहेत, तसेच मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले.

सोमवारी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. 'सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी योग्य चौकशी व्हावी, अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी, ' असे ट्विट पार्थ पवार यांनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details