महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोशल माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई - महाराष्ट्र कोरोना

काही असामाजिक तत्वांकडून लॉकडाऊनसंदर्भात अफवा पसरविण्याचे काम केले जाण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींविरोधात कारवाईचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

सोशल माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
सोशल माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

By

Published : Apr 9, 2021, 12:02 PM IST

मुंबई :देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे या संदर्भात नव्याने निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मुंबई शहरात सोमवारपासून कडक निर्बंध अमलात आलेले असून शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या दरम्यान काही असामाजिक तत्वांकडून लॉकडाऊनसंदर्भात अफवा पसरविण्याचे काम केले जाण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींविरोधात कारवाईचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

सोशल माध्यमांवर पोलिसांची असणार नजर
मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचे एक खास पथक अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या सोशल माध्यमांवरील अकाउंटवर नजर ठेवत आहे. व्हाट्सऍप, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर व इतर सोशल माध्यमांवर या पथकाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.

कलम 188 चे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई
मुंबई पोलिसांनी 20 मार्च 2020 ते 8 एप्रिल 2021 या दरम्यान मुंबई शहरात कलम 188 चे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 59,552 आरोपींवर गुन्हे दाखल केले असून यामध्ये आतापर्यंत 9136 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. 20240 आरोपींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडले असून तब्बल 27176 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details