महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Police Tweet : मुंबई पोलिसांची ट्विटरद्वारे मास्कसाठी जनजागृती - मुंबई पोलीस ट्विट

नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याच सांगत मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने पोस्ट शेअर केली (Mumbai Police Tweet) आहे.

Mumbai Police Tweet
Mumbai Police Tweet

By

Published : Jan 11, 2022, 7:50 PM IST

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात देखील कोरोना तसेच ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीसह अनेकजणांना कोरोनाची लागण (Bollywood Celebrities infected corona) झाली. नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याच सांगत मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने पोस्ट शेअर केली (Mumbai Police Tweet) आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून काही निर्बंध सुद्धा लावण्यात आली आहेत. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रसासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. राज्य सरकारकडून वारंवार मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या जात आहे. तरी देखील नागरिक मात्र याला गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी आपल्या हटके भाषेत जनजागृती करण्याचे काम केले आहे.

पोलीसांच्या ट्विटची चर्चा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा होत असून, कोरोनाने आपली विकेट घेऊ नये असे वाटत असेल तर मास्क नामक हेल्मेटच ठरू शकेल. आपली सर्वोत्तम रणनीती मास्क वापरा, लसीकरण करा आणि कोरोनाचे नियम पाळा या आशयाचं हे ट्विट सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करून पसंती दर्शवली आहे.

पोलीसांचे हटके ट्विटर अकाऊंट
मुंबई पोलीस सोशल मीडियात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत असतात. त्यावर नवीन नवीन सोशल मीडियावर पोस्ट करत सक्रिय असतात. अनेकदा मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन नागरिकांना सतर्क करणारे, आवाहन करणारे किंवा सल्ला देणारे मीम्स पोस्ट करण्यात येत असतात. नुकतच मुंबई पोलिसांकडून एक ट्विट करण्यात आलं असून त्याद्वारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागिरकांना करण्यात आले आहे.
हेही वाचा -Khandoba Yatra canceled in Pali : पालीच्या खंडोबाची यात्रा कोरोनामुळे रद्द, भाविकांकरिता ऑनलाईन दर्शनाची सोय

ABOUT THE AUTHOR

...view details