महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मालाड इमारत दुर्घटना प्रकरणात मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल - पोलीस आयुक्त नांगरे पाटील - register case against the owner

या इमारतीला तौक्ते वादळाच्या वेळीच तडा गेलेला होता. काही स्ट्रक्चरल गोष्टीत बदल केल्याने ही बिल्डिंग कोसळली. सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ९ जणांचा आणि ज्या इमारतीवर ही बिल्डिंग कोसळली त्या इमारतीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. ७ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त नांगरे पाटील
पोलीस आयुक्त नांगरे पाटील

By

Published : Jun 10, 2021, 11:55 AM IST

मुंबई- शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

पोलीस आयुक्त नांगरे पाटील

बुधवारी मुंबईत मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड मालवणीमधील इमारत कोसळळी. या घटनेनंतर जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कारण आसपासच्या इमारतीदेखील जुन्या आणि धोकादायक अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला आणि त्यांनी कारवाईबाबतची महत्त्वाची माहिती दिली.

पाटील म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे. या इमारतीला तौक्ते वादळाच्या वेळीच तडा गेलेला होता. काही स्ट्रक्चरल गोष्टीत बदल केल्याने ही बिल्डिंग कोसळली. सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ९ जणांचा आणि ज्या इमारतीवर ही बिल्डिंग कोसळली त्या इमारतीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. ७ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.

"जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून आम्ही या घटनेबद्दलची माहिती घेत आहोत. जी इमारत कोसळली ते बांधकाम अनाधिकृत होते. त्या बांधकामात काही स्ट्रक्चरल डीफॉल्ट्स (बांधकामातील त्रुटी) होत्या. तौक्तेचा तडाखा हा इमारतीला जेव्हा बसला तेव्हाच याची देखभाल दुरूस्ती केली गेली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती", अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details