मुंबई- लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात ११ ऑक्टोबरला बंद पुकारला आहे. बंद काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांकडून देशाच्या आर्थिक राजधानीत तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ तुकड्या, ५०० होमगार्ड आणि स्थानिक शस्त्र दलाचे ७०० लोक बंदोबस्तात असणार आहेत, ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांकडून जास्तीत मनुष्यबळ हे शहरांमधील विविध रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांकडून गस्तीचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. नवरात्रीनिमित्त यापूर्वीच पोलीस अधिक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, बंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जास्तीत मनुष्यबळ हे बंदोबस्तात वापरण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-उद्या महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद
शिवसेना सर्व ताकदीनिशी बंदमध्ये होणार सहभागी