मुंबई- कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस मुंबईत वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी करण्यात आली असून बाहेर फिरण्यास मनाई आहे. या काळात पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. 20 मार्च ते 6 मेच्या दरम्यान मुंबई शहरात अकरा हजारांहुन अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात टाळेबंदीच्या काळात 17 मेपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला आहे. 20 मार्च ते 6 मे या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघण करणाऱ्याच्या संदर्भात 5 हजार 902 प्रकरणात तब्बल 11 हजार 111 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 1 हजार 356 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 2 हजार 922 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे तर 6 हजार 833 आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.