महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kedar Dighe : केदार दिघेंच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांचे 'त्या' प्रकरणी समन्स - केदार दिघे मुंबई पोलीस समन्स मराठी बातमी

बलात्कार पीडित महिलेला धमकवल्याप्रकरणी केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी केदार दिघेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावले ( mumbai police summon sena leader kedar dighe ) आहे.

Kedar Dighe
Kedar Dighe

By

Published : Aug 5, 2022, 7:22 PM IST

Updated : Aug 5, 2022, 7:34 PM IST

मुंबई - शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. बलात्कार पीडित महिलेला धमकवल्याप्रकरणी केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी केदार दिघेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाण्याची जबाबदारी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंवर सोपावली होती. मात्र, नियुक्ती केल्यानंतरच केदार दिघे कायद्याच्या चौकटीत अडकले ( mumbai police summon sena leader kedar dighe ) आहेत.

केदार दिघे यांच्यावर एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात बलात्कार पीडितेला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामधील मुख्य आरोपी रोहित कपूर आहे. त्याचा शोध पोलीस करत आहेत. या प्रकरणी केदार दिघे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यात आल आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स पाठविलं आहे. परंतु, या समन्सवर ठराविक दिवसांची तारीख टाकण्यात आली नाही. लवकरात लवकर हजर राहा, असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

बलात्कार पीडितेनं तक्रार दिली. त्यानुसार रोहित कपूर आणि केदार दिघे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असा जबाब नोंदविला होता. कपूर आणि दिघे या दोघांवरही एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केदार दिघे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे केदार दिघे हे पोलीस ठाण्यात चौकशीला केव्हा हजर राहतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

काय आहे प्रकरण? -रोहित कपूर याने 28 जुलै रोजी लोअर परळच्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये एका कर्मचारी तरुणीवर बलात्कार केला. आरोपीने पीडितेला धनादेश देण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याची वाच्यता कुठंही करू नये. किंवा पोलिसांत तक्रार होऊ नये याप्रकरणी केदार दिघे यांनी बलात्कार पीडितेला धमकावले, असे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. याचप्रकरणी पोलिसांनी दिघेविरोधांत धमकी तर रोहित कपुरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -Deepak Kesarkar : सुशांतसिंह प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा राणेंकडून डाव; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

Last Updated : Aug 5, 2022, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details