मुंबई- साकीनाका येथून पोलिसांनी तब्बल ३४५ किलोचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एकाला अटक केली आहे. अशोक माणिक म्हेत्रे ,(३९ वर्षे)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
साकीनाका येथून तब्बल ३४५ किलोचा गांजा जप्त - सुशातसिंह आत्महत्या प्रकरण
मुंबई पोलिसांनी साकीनाका येथून तब्बल ३४५ किलो गांजा जप्त केला आहे. छापा टाकून केलेल्या या कारवाईत एकाला अटकही करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणांचा शोध अधिक तीव्रतेने होऊ लागला आहे. त्यानंतर त्या संबंधित अनेक व्यक्तींची NCB कडून चौकशी करण्यात आली. तर अद्याप धाडसत्र सुरुच आहेत. दरम्यान शुक्रवारी साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत संघर्षनगर चांदीवली येथे मोठया प्रमाणात गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदीवली येथील संघर्ष नगरात इमारतीवर( क.९० / एच) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३४५ किलो ५२५ ग्रॅम गांजा जप्त केला.