मुंबई- मुंबई पोलीस खात्यामध्ये दोन गट निर्माण झाले असून यातील एक गट हा सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासंदर्भात नाराज आहे. तो गट परवीर सिंह यांच्या विरोधात बंड करणार असल्याचे वृत्त रिपब्लिक या वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते. त्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलीस खात्याची बदनामी करण्याचा आरोप करत रिपब्लिकन वृत्तवाहिनीच्या चार कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या शिवानी गुप्ता , निरंजन नारायण स्वामी, शावन सेन व सागरिका मित्रा या कर्मचाऱ्यांचे पोलिसांनी जवाब नोंदवले आहेत.
रिपब्लिक कडून कुठलीही माहिती मिळत नसल्याचा पोलिसांचा दावा-
एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत चार जणांची चौकशी करण्यात आली आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीकडून प्रसारित झालेल्या बातमीच्या जबाबदारीची शहानिशा करण्यासाठी रिपब्लिक टीव्ही प्रशासनाकडून या गुन्ह्यातील तपासाकरिता आवश्यक माहिती मागवण्यात आलेली आहे. यासाठी वृत्त वाहिनीला यासंदर्भातील नोटीस देण्यात आलेली असून या गुन्ह्याच्या तपासासाठीची माहिती टीव्ही चॅनलकडून मागण्यात आलेली आहे. मात्र, रिपब्लिक वृत्तवाहिनीकडून एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला कुठलाही प्रतिसाद देण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हटले आहे जवाबात-
पोलिसांनी या संदर्भात चार जणांची चौकशी केली असता, यातील एक आरोपी शिवानी गुप्ता ज्या सीनियर असोशीएट एडिटर म्हणून रिपब्लिक वृत्तवाहिनी काम करत आहेत. त्यांनी ज्या प्रकरणी तक्रार केली आहे. तो मजकूर वाचला असल्याचे म्हटले आहे. शिवानी यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी न्यूज रूम मधील आय न्यूज नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे आउटपुट शिफ्ट इंचार्जच्या मार्फत टेलिप्रोम्प्टरवर प्राप्त झालेला मजकूर कार्यक्रमात अँकर म्हणून वाचून दाखविला आहे.
'त्या' वृत्तवाहिनीच्या 4 जणांची पोलीस चौकशी, मुंबई पोलिसांनी नोंदवले जवाब
मुंबई पोलीस आयुक्त परवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त रिपब्लीक टीव्हीने चालवल्याची तक्रार नोंदवली होती. त्या संदर्भात त्या वृत्तवाहिनीच्या चार कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी चौघांचे जवाब नोंदवले आहेत.
काय आहे प्रकरण -
रिपब्लिक वृत्तवाहिनीवर 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपित झालेल्या बिगेस्ट स्टोरी टूनाईट या कार्यक्रमादरम्यान मुंबई पोलीस खात्यात दोन गट पडले असून एक गट सध्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात बंड करणार असल्याची बातमी प्रसारीत केली होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून रिपब्लिक नेटवर्कमध्ये काम करत असलेल्या अँकर शिवानी गुप्ता रिपोर्टर , रिपोर्टर सागरिका मित्रा शावन सेन , एक्झिक्युटिवे एडिटर निरंजन नारायण स्वामी यांच्या विरोधात कलम 3(1) पोलीस ( आप्रितीची भावना चेतविणे) अधिनियम 1922 सह कलम 34 नुसार गुन्हा नोंदविला होता.