महाराष्ट्र

maharashtra

Kedar Dighes Statement : बलात्कार पीडित महिलेला धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी केदार दिघे यांचा जबाब नोंदवला

By

Published : Aug 9, 2022, 10:33 PM IST

शिवसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे ( Shiv Senas Thane District President Kedar Dighe ) यांच्यावर बलात्कार पीडित महिलेला धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एनएम जोशी मार्ग पोलिसांनी सोमवारी दिघे यांचा जबाब नोंदवला ( mumbai police recorded kedar dighes statement ) आहे.

mumbai police recorded kedar dighes statement
केदार दिघे

मुंबई :शिवसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे ( Shiv Senas Thane District President Kedar Dighe ) यांच्यावर बलात्कार पीडित महिलेला धमकी दिल्या प्रकरणी ( Kedar Dighe threaten rape victim ) गुन्हा दाखल ( case registered again kedar dighe in threating rape victim ) करण्यात आला होता. या प्रकरणात एनएम जोशी मार्ग पोलिसांनी सोमवारी दिघे यांचा जबाब नोंदवला ( mumbai police recorded kedar dighes statement ) आहे. केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर ( Mumbai Sessions Court approves pre arrest bail application of kedar dighe ) केल्यानंतर ते सोमवारी चौकशीला हजर झाले होते.


केदार दिघे यांनी धमकी दिल्याचा आरोप नाकारला-केदार दिघे यांचा एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार आणि गुन्हेगारी धमकी प्रकरणी जबाब नोंदवण्यात आला. केदार दिघे यांनी कोणालाही धमकी दिल्याचे नाकारले असल्याची माहिती आहे. केदार दिघे सोमवारी सकाळी आपल्या वकिलासह पोलीस ठाण्यात आले. आपल्या निवेदनात त्यांनी तक्रारदाराला धमकी दिल्याचे नाकारले. दिल्लीतील व्यावसायिक रोहित कपूरने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता.


दिघे यांच्या अडचणीत वाढ -केदार दिघे यांनी महिलेला तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची वाच्यता न करण्याची धमकी दिली. आरोपी रोहित कपूर यांच्या विरोधात मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात भा.द.वि.376, 506(2 ) कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी केली होती. गुन्हेगारी धमकीच्या आरोपात केदार दिघे यांचेही नाव गुन्ह्यात नोंदवले असल्यामुळे त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने येत्या काळामध्ये केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे.

हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : 18 आमदारांचा शपथविधी, आरोप-प्रत्यारोप...; 'असा' राहिला मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस

ABOUT THE AUTHOR

...view details