मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणी ( Phone Tapping Case ) मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांची विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांची दोन वेळा चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात आता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on Phone Tapping Case ) यांचा कुलाबा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 10 एप्रिल) सामना कार्यालयात जाऊन संजय राऊत यांचा दोन तास जबाब नोंदवला आहे.
खडसेंचाही नोंदवला गेला जबाब - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्या ( Eknath Khadse ) प्रकरणात मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातच गुरुवारी एकनाथ खडसे यांची कुलाबा पोलिसांनी दोन तास जबाब नोंदवण्यात आला होता. आज शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील या प्रकरणात जवाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे.
शुक्ला यांची उच्च न्यायालयात धाव - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर यापूर्वी पुण्यातील पोलीस ठाण्यात फोन टॅपिंग प्रकरणात सर्वात प्रथम गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रश्मी शुक्ला यांनी कुलाबा पोलीस ठाणे आणि पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणात चौकशीला समोर गेल्या होते.