मुंबई :मुंबईच्या वनराई पोलिसांनी ( Vanrai Police Station Mumbai ) गोरेगावमधून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश (call center racket arrested in Mumbai cheated foreign nationals ) केला आहे. या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांना त्यांच्यासंगणकातील बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाने कॉल ( call for fixing a computer malfunction ) केले जात होते. बनावट कॉल सेंटरशी संबंधित सहा जणांना पोलिसांनी अटक केली ( Six workers arrested of fake call center mumbai ) असून अजून कॉल सेंटरचे दोन्ही मालक फरार आहेत. पोलिसांनी मालकांचे दोन लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क, १० सेलफोन आणि ३.२ लाख रुपये रोख जप्त केले. fake call center exposed Goregaon Mumbai
Fake Call Center Raid Mumbai अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटर रॅकेट उद्ध्वस्त - fake call center exposed Goregaon Mumbai
मुंबईच्या वनराई पोलिसांनी ( Vanrai Police Station Mumbai ) गोरेगावमधून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश (call center racket arrested in Mumbai cheated foreign nationals ) करत ते उध्वस्त केले आहे. या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांना त्यांच्या संगणकातील बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाने कॉल ( call for fixing a computer malfunction ) केले जात होते. बनावट कॉल सेंटरशी संबंधित सहा जणांना पोलिसांनी अटक केली ( Six workers arrested of fake call center mumbai ) पोलिसांनी मालकांचे दोन लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क, १० सेलफोन आणि ३.२ लाख रुपये रोख जप्त केले. fake call center exposed Goregaon Mumbai
ठगांची कार्यपद्धती : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ ऑगस्ट रोजी वनराई पोलीस ठाणे आणि दिंडोशी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जून महिन्यापासून व्यापारी संकुलात कार्यरत असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. पोलिसांना हेडफोनसह १८ टेली-कॉलर कामावर आढळले.कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्यांना 15,000 ते 20,000 रुपये मासिक वेतन दिले जात होते. आवारातील २५ संगणक तपासले असता, त्यांना इंटरनेटवर आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी वापरल्या जाणार्या सॉफ्टवेअरशिवाय अमेरिकन नागरिकांच्या संपर्क तपशीलासह फायली सापडल्या. अमेरिकन लोकांशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपही होत्या. काही डेटा हटवला गेला होता.
अमेरिकन नागरिक लक्ष्य :आरोपींनी अमेरिकन नागरिकांचे संपर्क तपशील गोळा केले तसेच त्यांना संपर्क साधून त्यांच्या संगणकांमध्ये व्हायरस आल्याची माहिती दिली. घाबरलेल्या ग्राहकाकडून पैसे उकळत असत. या रॅकेटमध्ये गिफ्ट कार्ड पेमेंटचा एक प्रकार म्हणून स्वीकारले गेले. किमान १००अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती आहे.या सेंटरकडे दूरसंचार विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा कॉल सेंटर चालवण्याचा परवाना नव्हता. या आरोपींवर यापूर्वी गुन्हे शाखेने २०१८मध्ये असेच बोगस कॉल सेंटर चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.